Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

श्री महालक्ष्मी कलामंचाच्या “वीररत्न बाजीप्रभू” नाटकाचा शनिवारी मुंबईत शुभारंभ

Advertisements

मुंबई : येथील श्री महालक्ष्मी कलामंच निर्मित, विद्याधर शिवणकर लिखित “वीररत्न बाजीप्रभू” या ऐतिहासिक नाटकाचा शुभारंभ मुंबईत शनिवारी (दि. २१ जानेवारी) होत आहे.

श्री महालक्ष्मी कलामंच या संस्थेच्या राम शिंदे यांनी लिहिलेल्या “वीर शिवाजी” या नाटकाचे महाराष्ट्र आणि गोव्यात ३१ प्रयोग झाले. ऐतिहासिक नाटकाचा वारसा जपण्याचा प्रयत्न संस्था करत असून आता बाजीप्रभूंच्या जीवनावर आधारित नाटक सादर करण्यात येणार आहे.

नाटकाचे सूत्रधार संजय मांडवकर असून दिग्दर्शन प्रकाश लाड यांचे आहे. अऩ्य श्रेयनामावली अशी – रंगभूषा उलेश खंदारे, प्रकाशयोजना नितीन बैकर, संगीत योगेश बांद्रे आणि अविनाश गोसावी, व्यवस्थापन आत्माराम बाचीम, संतोष सारंग, विनायक धामणे, शेखर आंग्रे, ओमकार बोरकर, गिरीजा शिंदे, अक्षता अवसरे, श्वेताली अडसूळ. नाटकात भूमिका करणारे कलावंत असे – संजय मांडवकर, प्रदीप रेवाळे, आत्माराम बाचीम, विनायक धामणे, दीपक रायकर, शेखर आंग्रे, ओमकार बोरकर, सोनल गुरव, श्रद्धा पांचाळ, लेखक विद्याधर शिवणकर. वरिष्ठ कलाकारांबरोबरच प्रसाद धोपट, हरीश कदम, सचिन पानगले, अमोल जोगरे, प्रणय धाडवे, संदेश आंग्रे, लवू भातडे, सागर घाणेकर, राहुल तटकरे, दिनेश निंबरे, रवींद्र केसरकर आदी नव्या आणि अनुभवी कलाकारांचा अभिनय रसिकांना पाहायला मिळणार आहे.

नाटकाच्या शुभारंभाला सिनेक्षेत्रातील अभिनेते, दिग्दर्शक अनिल गवस तसेच नाट्यक्षेत्रातील अनेक नामांकित मंडळी उपस्थित राहणार आहे. परळ येथील दामोदर नाट्यगृहात शनिवारी रात्री ८.३० वाजता नाटकाचा प्रयोग सुरू होईल. अवघ्या १५० आणि १०० रुपये तिकीटदरात पाहायला मिळणाऱ्या या नाटकाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा, असे आवाहन महालक्ष्मी कलामंच संस्थेने केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version