Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

राजापूरला जुलैच्या प्रारंभी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

Advertisements

रत्नागिरी : राजापूर येथील युवा कॅरमप्रेमी संघटनेने रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित केली आहे. रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा १ आणि २ जुलै रोजी होणार आहे.

स्पर्धा राजापूर हायस्कूलच्या कलामंदिर सभागृहात होणार असून स्पर्धेत ब्रेक टू फिनिश आणि ब्लॅक टू फिनिश नोंदविणाऱ्या खेळाडूंना प्रथम फेरीपासून खास रोख पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धा पुरुष एकेरी, महिला गट एकेरी, पुरुष दुहेरी, कुमार गट, कुमारी गट, किशोर गट आणि किशोरी गट अशा सात गटांत होणार आहे. स्पर्धा अखिल भारतीय कॅरम फेडरेशन (राष्ट्रीय संघटना) आणि आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनच्या प्रचलित स्पर्धा नियमावलीनुसार होईल. या क्रीडा वर्षातील ही तिसरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा असून खेळाडूंनी २०२३-२४ या वर्षाचे ५० रुपये नोंदणी शुल्क जिल्हा असोसिएशनकडे जमा करावे. स्पर्धेसाठी एकेरी गटासाठी प्रत्येकी १५०, पुरुष दुहेरी प्रत्येकी ३०० रुपये असे शुल्क राहील. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवश्यक आहे. अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करण्यात येईल. इच्छुक सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका मंगळवार, २७ जून २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच स्पर्धा शुल्कासह सादर करायच्या आहेत. स्पर्धेत सामना खेळताना पांढरा टीशर्ट किंवा शर्ट खेळाडूने परिधान करणे आवश्यक आहे.

स्पर्धेच्या प्रवेशिका सादर करण्याची ठिकाणे अशी – गुहागर प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०), रत्नागिरी विनायक जोशी (८३९०३८७४८३), मोहन हजारे (९४२२०५३९४३), राहुल भस्मे (९६५७६३७६७८), चिपळूण साईप्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), दीपक वाटेकर (९९७५५४६६२५), संगमेश्वर मनमोहन बेंडके (९१३०३०६५२५), लांजा विकास इंदुलकर (९४०३७६९४४९), खेड योगेश आपटे (०९९५३२२२६३९१), राजापूर मनोज सप्रे (९२७२४२०८३७).

स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून राष्ट्रीय पंच साईप्रकाश कानिटकर आणि मंदार दळवी यांची निवड करण्यात आली आहे.

स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन युवा कॅरमप्रेमी राजापूर कॅरम संघटना, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचयअण्णा रेडीज, सचिव मिलिंद साप्ते यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version