कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाची नवी कार्यकारिणी

रत्नागिरी : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या नव्या कार्यकारिणीची निवड बिनविरोध झाली.

संघाची सत्ताविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष मारुती अंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये २०२३ ते २०२६ या आगामी तीन वर्षांच्या कार्यकारिणीवर मारुती अंबरे, सुरेश शेलार, मुकुंद जोशी, डॉ. मनोहर चांडगे, श्रीमती शुभांगी भावे, श्रीमती वृषाली घाणेकर, सुधाकर देवस्थळी, श्रीमती वंदना कोतवडेकर, राजेंद्र कदम, प्रकाश शिंदे आणि श्रीमती सुवर्णा चव्हाण अशा ११ सदस्यांची बिनविरोध निवड झाली.

संघाचे विद्यमान कोषाध्यक्ष श्यामसुंदर सावंतदेसाई यांनी संघाने वर्षभरात ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. सभेत नव्या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. संघाचे २८३ आजीव सभासद असून त्यांच्या प्रतिसादामुळे साठ हजार रुपयांचा आधार निधी जमा झाला. चालू वर्षीही सर्व सभासदांनी प्रत्येकी दोनशे रुपयेप्रमाणे आधार निधी जमा करून सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष मारुती अंबरे यांनी केले. कार्यवाह सुरेश शेलार यांनी आभार मानले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply