चंद्रनगर शाळेत ‘रावे’च्या विद्यार्थ्यांचे श्रमदान

दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव म्हणजेच ‘रावे’ उपक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चंद्रनगर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळेत दोन दिवस श्रमदान केले.

‘रावे’ या कृषी कार्यानुभव उपक्रमासाठी कृषी महाविद्यालयातील जयसिंगराव चव्हाण, हरीश बागूल, मयूरेश गोडसे, अभिषेक पाटील, सुधांशु गोलामडे, तुषार तांडेल, अभिराज खरात, प्रथम साखळकर, सिद्धिविनायक साळुंके, समर्थ कावळे, मयूर सुरासे, उदय अरोटे, प्रथमेश सपकाळे या विद्यार्थ्यांनी चंद्रनगर शाळेच्या आवाराची साफसफाई केली. तसेच त्यांनी वांग्याच्या रोपांची लागवड करून सुंदर परसबागही फुलवली आहे. शाळेच्या मोकळ्या जागेत या विद्यार्थ्यांनी नाचणी या सात्त्विक तृणधान्याचीही लागवड केली आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गटवार चित्रकला व तृणधान्य ओळख स्पर्धा आयोजित करून स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसांचे वाटप केले.

‘रावे’ उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक अर्चना सावंत, मनोज वेदक, बाबू घाडीगावकर, मानसी सावंत या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. ‘रावे’ उपक्रमासाठी चंद्रनगर शाळेची निवड केल्याबद्दल शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रूपेश बैकर, उपाध्यक्ष राकेश शिगवण, सरपंच भाग्यश्री जगदाळे, मुख्याध्यापिका अर्चना सावंत यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply