रत्नागिरी : मालेगाव (जि. नाशिक) येथील आई प्रतिष्ठानतर्फे विविध वाङ्मयीन पुरस्कारासाठी साहित्य मागविण्यात येत आहे. त्याला कोकणातूनही प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मालेगाव येथील आई प्रतिष्ठान ही शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक चळवळ आहे. प्रतिष्ठानतर्फे दुसऱ्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विविध वाङ्मयीन पुरस्कारासाठी साहित्य मागविण्यात येत आहे, अशी माहिती प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष राजेंद्र दिघे यांनी दिली. वाङ्मयीन पुरस्कारांचा तपशील असा – गझलसंग्रह : कवी कमलाकर देसले स्मृती साहित्य पुरस्कार, काव्यसंग्रह : रामकृष्ण अहिरे स्मृती साहित्य पुरस्कार, कथासंग्रह : अभिमन कदम स्मृती साहित्य पुरस्कार, वैचारिक/समीक्षा : सीताबाई बोरसे स्मृती साहित्य पुरस्कार, बालसाहित्य : कै. सुशीलाबाई सावळे साहित्य पुरस्कार, कादंबरी : सखुबाई पवार स्मृती साहित्य पुरस्कार.
साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्काराचे स्वरूप रोख ११०० रुपये, गौरवचिन्ह, गौरवपत्र असे असून १ जानेवारी २०२१ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्याच्या दोन प्रती या पुरस्कारांसाठी कवी, लेखक, साहित्यिकांनी पाठवावे. सोबत पाच रुपयांचे पोस्टेज आणि एक पोस्टकार्डही पाठवावे. हे साहित्य येत्या १५ सप्टेंबरपर्यंत श्रीराम मोरे, प्रसिद्धी प्रमुख, आई प्रतिष्ठान, शाम निवास, समर्थ नगर, पोलीस लाइनच्या मागे, रावळगाव नाका, मालेगाव ता.मालेगाव जि. नाशिक- ४२३२०३ या पत्त्यावर पाठवावे अधिक माहितीसाठी 9881178203 या मोबाइलवर संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र दिघे, सचिव गिरीश सूर्यवंशी, कार्याध्यक्ष प्रवीण शिंदे, कार्यवाह सुमित बच्छाव, कोषाध्यक्ष शिवदास निकम, पुरस्कार संयोजक लता सूर्यवंशी, मनीषा सावळे आणि वैजिनाथ भारती यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

