श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयात स्थापना दिन उत्साहात

देवरूख : येथील शतायुषी श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयाचा स्थापनादिन अत्यंत उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला.

कार्यकारी मंडळ आणि कर्मचारी वृंद यांच्या वतीने श्री ग्रंथपूजा आणि श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने ज्योती महिला मंडळाने भजन सादर केले.

सायंकाळच्या कार्यक्रमात कुमार शौर्य सचिन शिंदे, कुमारी वेदांती प्रदीप राव, कुमार विहंग योगेश फाटक आणि कुमार वरद चंद्रकिरण दांडेकर यांना ‘बालवाचक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. वाचनालयाच्या ज्येष्ठ सदस्या श्रीमती शीला श्रीराम हेगशेट्ये, आनंद विश्वनाथ जाधव आणि अरुण शंकर चौगुले यांना ‘ज्येष्ठ वाचक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

कीर्तन आणि ज्योतिष या विषयात विशेष कार्य केलेल्या डॉ. दत्तात्रय वाडदेकर, दानशूर शरद कृष्णाजी राजवाडे, समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेले निखिल कोळवणकर आणि ज्येष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांचा सन्मानपत्र, शाल, गुलाब पुष्प आणि ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला. कॅरम स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळविलेल्या कुमार द्रोण मोहन हजारे याचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

राजाराम पंडित आणि अमेय पंडित यांनी ‘स्वरसंध्या’ हा गीतगायनाचा बहारदार कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्तम दाद दिली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply