मराठी विज्ञान परिषदेची विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

मुंबई : मराठी विज्ञान परिषदेतर्फे होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना असून त्याकरिता ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मूलभूत विज्ञानात उच्च शिक्षणाकरिता गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहनापर साहाय्य मिळावे, याकरिता मराठी विज्ञान परिषदेने शिष्यवृत्ती योजना २०१६पासून नवीन स्वरूपात सुरु केली. या शिष्यवृत्तीकरिता यावर्षी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या प्रत्येक विषयातील आठ म्हणजे एकूण ३२ विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.

चालू २०२४-२०२५ शैक्षणिक वर्षात एमएस्सी, एमए (गणित) या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. त्यासाठी त्यांनी https://forms.gle/38QdFgHa12EtEX889 या लिंकचा उपयोग करावा. अधिक माहितीकरिता ९९६९१ ००९६१ या क्रमांकावर सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क साधावा. मराठी विज्ञान परिषदेच्या https://mavipa.org या संकेतस्थळावरही अधिक माहिती मिळू शकेल.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply