भगिनी मंडळ वक्तृत्व स्पर्धेत मुक्ता बापट, तपस्या बोरकर प्रथम

रत्नागिरी : येथील टिळक आळी भगिनी मंडळातर्फे लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हतो. त्यामध्ये पाचवी ते सातवीच्या गटात मुक्ता बापट व आठवी ते दहावी गटात तपस्या बोरकर हिने प्रथम क्रमांक पटकावला.

स्पर्धेत एकूण ६५ स्पर्धक सहभागी झाले. पाचवी ते सातवीच्या गटात द्वितीय मनवा जोशी, तृतीय स्पृहा भावे यांनी यश मिळवले. आठवी ते दहावीच्या गटामध्ये द्वितीय श्रिया परब, मंजिरी सावंत (विभागून) आणि तृतीय क्रमांक स्वरा मुसळे हिने प्राप्त केला.

स्पर्धेचे परीक्षण सेवानिवृत्त शिक्षिका सौ. दाक्षायणी बोपर्डीकर आणि प्रा. पंकज घाटे यांनी केले. विजेत्यांना टिळक आळी भगिनी मंडळाच्या अध्यक्ष सौ. राधिका वैद्य, उपाध्यक्षा सौ. अर्चना जोगळेकर, सौ. वैशाली जोशी, स्मारकाच्या अध्यक्षा श्रीमती पद्मजा बापट यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. सूत्रसंचालन सौ. तेजस्विनी गाडगीळ यांनी केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply