पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा २४, २५ सप्टेंबरला चिपळूणमध्ये

रत्नागिरी : यावर्षीची रत्नागिरी केंद्रावरची पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा रत्नागिरीऐवजी चिपळूण येथे २४ आणि २५ सप्टेंबरला होणार आहे.

पुण्यातील महाराष्ट्रीय कलोपासक आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्या सहयोगाने पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा चिपळूण येथे आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २४ आणि २५ सप्टेंबर रोजी चिपळूण येथील स्व. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात होणार आहे. या एकांकिका स्पर्धेमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यामधील वरिष्ठ महाविद्यालयांना सहभागी होता येणार आहे.

महाराष्ट्रीय कलोपासक संस्था पुण्यात गेली ५९ वर्षे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करीत असून २०१० पासून ही स्पर्धा, कोल्हापूर, जळगाव, रत्नागिरी आणि नागपूर या केंद्रांवर होते. यावर्षी ही स्पर्धा रत्नागिरीऐवजी चिपळूण येथे घेण्यात येणार आहे.

स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी महाविद्यालयांनी १० सप्टेंबर, २०२४ पर्यंत प्रवेश अर्ज, सचिव, अ. भा. म. नाट्य परिषद, शाखा चिपळूण, स्व. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, ता. चिपळूण जि. रत्नागिरी या पत्त्यावर पाठवायचे आहेत. स्पर्धेचे लॉटस् १९ सप्टेंबर रोजी नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्या कार्यालयात टाकण्यात येणार आहेत.

स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी मंगेश बापट (९४२२००३४२२), संदीप जोशी (९६७३६३३४१८) आणि दिलीप आंब्रे (९६९९१२४३६३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे सचिव दिलीप आंब्रे यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply