कथालेखिकांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा – प्रा. अश्विनी निवर्गी

रत्नागिरी : कथालेखिकांनी कथालेखन करताना बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन प्रा. अश्विनी निगर्वी यांनी केले.

आम्ही सिद्ध लेखिका साहित्य संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे राज्यभरातील लेखिकांसाठी दूरस्थ माध्यमातून कथालेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. राज्यभरातून ८० लेखिका या कार्यशाळेत सहभागी झाल्या.

आम्ही सिद्ध लेखिका रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्षा श्रीमती सुनेत्रा जोशी यांच्या पुढाकाराने राज्यभरातील साहित्यिक सदस्यांसाठी कथालेखन प्रकाराचे उत्तम मार्गदर्शन व्हावे व त्यातूनच उत्तम कथालेखिका निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने ह्या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सुप्रसिद्ध कथालेखिका प्रा. अश्विनी निवर्गी यांना निमंत्रित करण्यात आले होते. चार तासांच्या या कार्यशाळेत प्रा. अश्विनी निवर्गी यांनी स्लाइड्सच्या माध्यमातून कथालेखनासाठी आवश्यक अशा मांडणीच्या अनेक मुद्द्यांवर सोदाहरण विस्तृत विवेचन केले. कथालेखन करताना आकर्षक, अर्थपूर्ण शीर्षक आणि परिणामकारक शेवट, शब्दसंख्या, शुद्धलेखन, शैली, अशा महत्त्वाच्या अनेक बाबींवर लक्ष द्या. आजच्या काळानुरूप मोबाइल, संगणक इत्यादी तंत्रज्ञानाची जुजबी माहितीही आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.

लेखनशैली, मुद्देसूद मांडणी, शुढलेखन, कथाबीज इत्यादींवर त्यांनी सविस्तर माहिती दिली. लिखाणासाठी उत्तम वाचनही आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. ईमेल, युनिकोड, वर्डफाइल, पीडीएफ, पेन ड्राइव्ह इत्यादी आयुधांचा वापर कसा करावा, ते त्यांनी सांगितले. त्यांनी विविध विषयांवरील लिखाणाची अनेक उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केले. उपस्थित लेखिकांच्या प्रश्नांनाही त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.

कार्यशाळेसाठी केंद्रीय कार्यकारिणीच्या अध्यक्षा ठाण्याच्या पद्माताई हुशिंग यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांनी कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या. तसेच रत्नागिरी शाखेचेही कौतुक आणि अभिनंदन केले.

कार्यशाळेचा प्रारंभ आणि प्रास्ताविक सुनेत्रा जोशी यांनी केले. मान्यवरांचा परिचय प्रा. उमा जोशी यांनी करून दिला. केंद्रीय समितीच्या कार्याध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे यांनी मनोगत व्यक्त केले. अश्विनी निवर्गी यांनी केलेल्या उत्कृष्ट मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले. स्वागत, सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सौ. अनुराधा दीक्षित यांनी केले. या उपक्रमाची संपूर्ण तांत्रिक बाजू उमा जोशी यांनी उत्तमपणे सांभाळली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply