रत्नागिरीत प्रथमच तीन दिवसांची भारतीय गणित कार्यशाळा

रत्नागिरी : केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या आर्थिक सहयोगाने, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र, वेदांग ज्योतिष विभाग, रामटेक आणि संस्कृत विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने, रत्नागिरीत प्रथमच भारतीय गणित या विषयावर त्रिदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

येत्या २४ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ही कार्यशाळा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पार पडणार आहे. विज्ञान, आरोग्य, कृषी अशा विविध आणि प्रत्येक क्षेत्रात तत्कालीन भारतीय जाणकारांनी विशेष प्रयत्न केले आणि येत्या पिढीला ज्ञानकुंभ उपलब्ध करून दिला. याच भारतीय ज्ञान परंपरेतील एक विषय अर्थात गणितशास्त्र..भारतीय गणित हे कालौघात मागे पडू नये शिवाय त्याबाबत जागृती व्हावी, भारतीय गणिताचे महत्त्व सर्वदूर पसरावे व भारतीय गणिताला आधुनिकतेची जोड देऊन त्यात संशोधन व्हावे, हा या कार्यशाळेचा उद्देश आहे.

कार्यशाळेसाठी जाणकार मान्यवर येणार असून त्यांची व्याख्याने देखील अनुभवता येणार आहेत. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे गणित विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख प्रा. राजीव सप्रे २४ फेब्रुवारी रोजी “वैदिक गणित” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातील वेदांग ज्योतिष विभागाचे शोधछात्र अन्वेष देवुलपल्ली २५ फेब्रुवारी रोजी द भास्कराचार्य क्लासरूम या विषयावर मार्गदर्शन करणार असून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील सहयोगी प्रा. बाबासाहेब सुतार २६ फेब्रुवारी रोजी भारतीय खगोल गणित या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्याच दिवशी भारतीय गणिताचा इतिहास व व्यापकता या विषयावर कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातील वेदांग ज्योतिष विभागाचे अधिष्ठाता कृष्णकुमार पांडेय आपले विचार मांडणार आहेत. २५ व २६ फेब्रुवारी रोजी चाणक्य विद्यापीठातील कला, मानव्य व समाज विभागातील सहयोगी प्रा. रामकृष्ण पेजात्ताय “Indian Number System, Playful Mathematics : Selections from Lilavati and Beejaganit, Meru Prastara of Pingal” या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. माधव बापट २६ फेब्रुवारी रोजी “fruits of numbers” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

ही कार्यशाळा निःशुल्क असून नावनोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी स्वरूप काणे (7219054097) यांच्याशी संपर्क साधावा. रत्नागिरीकरांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

*नावनोंदणीसाठी लिंक
https://forms.gle/VK3vft66DpNaFoqd7

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply