रत्नागिरी : विविध वनस्पतींची ओळख करून देणारा कार्यक्रम रत्नागिरीत येत्या गुरुवारी, दि. ६ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने या संवादात्मक माहितीपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
रत्नागिरीतील ज्येष्ठ वनस्पती अभ्यासक विनायक वामन बापट यांच्याशी साधल्या जाणाऱ्या या संवादात्मक माहितीपूर्ण कार्यक्रमातून नक्षत्रांचे आराध्यवृक्ष, विविध धार्मिक पूजेसाठी लागणाऱ्या वनस्पतींच्या पत्री, आपल्या आवारातील वनस्पतींची ओळख तसेच त्यांची वैज्ञानिक माहिती, धार्मिक उपयोग अशी विविध माहिती दिली जाणार आहे. कोणाला एखाद्या झाडाचे नाव माहीत नसेल तर त्याची छोटी फांदी घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यास श्री. बापट आपल्याला नाव सांगण्याचा प्रयत्न करतील.
येत्या गुरुवारी, दि. ६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम रत्नागिरीत जोशी पाळंद येथील ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृहाच्या श्री भगवान परशुराम सभागृहात होणार आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media



