चिपळूणच्या माजी नगराध्यक्ष हेमलता बुरटे यांचे निधन

चिपळूण : चिपळूणच्या (जि. रत्नागिरी) माजी नगराध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या हेमलता बुरटे (वय ८५) यांचे आज (२० जुलै) दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. जनहितासाठी अभ्यासू वृत्तीने, आक्रमक पद्धतीने काम करणाऱ्या कार्यकर्त्या अशी त्यांची प्रतिमा होती. चिपळूण नगर परिषदेतील त्यांच्या कार्यकाळात अनेक नागरी सुविधा आणि महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांना चालना मिळाली होती.

गेल्या काही दिवसांपासून श्रीमती बुरटे अल्प आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने चिपळूण शहरातील एक सशक्त सामाजिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशी भावना व्यक्त होत आहे. हेमलताताई म्हणजे चिपळूणमधील नामवंत वकील शांतारामबापू बुरटे यांच्या पत्नी. बुरटे दाम्पत्याने आपल्या कार्याने सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात आपला ठसा उमटवला होता. करंजेश्वरी देवस्थान, चिपळूण अर्बन बँक, चिपळूण पालिका आदी संस्थांमध्ये शांतारामबापूंचे सक्रिय योगदान होते. हेमलताताईंच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुलगा पुणे येथे असतो, तर कन्या सीमा गिड्ये देवरूख येथे वकिली करतात. चिपळूण नगरपालिका, चिपळूण अर्बन बँक, करंजेश्वरी देवस्थान, तसेच विविध सामाजिक संघटनांतर्फे हेमलताताईंना श्रद्धांजली वाहण्यात आली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply