रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने दक्षिण रत्नागिरीची प्राथमिक फेरी (झोनल राऊंड) भारत शिक्षण मंडळाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात उत्साहात पार पडली.
संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या चार तालुक्यांमधील १६ महाविद्यालयांमधून सुमारे ७५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
प्राथमिक फेरीचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक नीलेश सावे, भारत शिक्षण मंडळ संस्थेच्या कार्याध्यक्षा नमिता कीर, कार्यवाह सुनील वणजू , रत्नागिरी जिल्हा समन्वयक डॉ. आनंद आंबेकर, सह समन्वयक प्रा. ताराचंद ढोबळे, प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा निकाल असा : भारतीय शास्त्रीय गायन (एकल) : प्रथम क्रमांक – गोगटे – जोगळेकर कॉलेज (रत्नागिरी), द्वितीय – कीर लॉ कॉलेज (रत्नागिरी). शास्त्रीय वाद्य (एकल) तालवाद्य : प्रथम – गोगटे-जोगळेकर कॉलेज. शास्त्रीय वाद्य (एकल) स्वरवाद्य : प्रथम – फिनोलेक्स अकॅडमी (रत्नागिरी), द्वितीय – गोगटे -जोगळेकर कॉलेज, इंडियन लाइट वोकल (एकल) : द्वितीय – गोगटे -जोगळेकर कॉलेज. भारतीय समूह गायन : प्रथम – गोगटे-जोगळेकर कॉलेज, द्वितीय – फिनोलेक्स अॅकॅडमी (रत्नागिरी), तृतीय – कीर लॉ कॉलेज. पाश्चात्य समूह गायन : तृतीय – कीर लॉ कॉलेज.भारतीय शास्त्रीय नृत्य : उत्तेजनार्थ फिनोलेक्स अॅकॅडमी (रत्नागिरी). भारतीय लोकनृत्य : प्रथम – गोगटे-जोगळेकर कॉलेज, द्वितीय – आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज, तृतीय – संगमेश्वर नवनिर्माण कॉलेज.
वक्तृत्व स्पर्धा (मराठी) : द्वितीय -कला, वाणिज्य आणि विज्ञान लांजा कॉलेज , उत्तेजनार्थ – भारत शिक्षण मंडळाचे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सीनियर कॉलेज (रत्नागिरी). उत्तेजनार्थ -गोगटे-जोगळेकर कॉलेज.वक्तृत्व स्पर्धा (इतर भाषा) : तृतीय – कीर लॉ कॉलेज ,उत्तेजनार्थ -गोगटे-जोगळेकर कॉलेज, उत्तेजनार्थ – फिनोलेक्स अॅकॅडमी (रत्नागिरी). वादविवाद स्पर्धा (मराठी) : प्रथम -भारत शिक्षण मंडळाचे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, द्वितीय –एल .एस .पेजे कॉलेज , तृतीय – कीर लॉ कॉलेज.वादविवाद स्पर्धा (इतर भाषा) : प्रथम – कीर लॉ कॉलेज, द्वितीय –गोगटे-जोगळेकर कॉलेज, तृतीय – भारत शिक्षण मंडळाचे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज.कथाकथन स्पर्धा (मराठी) : प्रथम – गोगटे-जोगळेकर कॉलेज, द्वितीय – फिनोलेक्स अकॅडमी (रत्नागिरी), तृतीय – आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज.कथाकथन स्पर्धा (इतर भाषा) : प्रथम – गोगटे-जोगळेकर कॉलेज.
एकांकिका (मराठी )- प्रथम – फिनोलेक्स अॅकॅडमी (रत्नागिरी), उत्तेजनार्थ – कीर लॉ कॉलेज. एकांकिका (इतर भाषा )- प्रथम – गोगटे-जोगळेकर कॉलेज.स्किट (मराठी) : प्रथम – गोगटे-जोगळेकर कॉलेज, द्वितीय – भारत शिक्षण मंडळाचे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज,तृतीय -फिनोलेक्स अॅकॅडमी. स्किट (इतर भाषा) : प्रथम – कीर लॉ कॉलेज.मोनो अक्टिंग (मराठी) : प्रथम – गोगटे-जोगळेकर कॉलेज, द्वितीय – भारत शिक्षण मंडळाचे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, तृतीय –डी.जे.सामंत कॉलेज (पाली). मोनो अॅक्टिंग (इतर भाषा) : प्रथम – एस. पी. हेगशेट्ये कॉलेज ,द्वितीय – भारत शिक्षण मंडळाचे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, तृतीय – गोगटे-जोगळेकर कॉलेज. नाटक (माइम) : प्रथम – एस. पी. हेगशेट्ये कॉलेज, द्वितीय –नवनिर्माण संगमेश्वर , तृतीय – गोगटे-जोगळेकर कॉलेज.
ऑन दी स्पॉट पेंटिंग : प्रथम – देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइनिंग, द्वितीय – फिनोलेक्स अकॅडमी, उत्तेजनार्थ -कीर लॉ कॉलेज .फाईन आर्ट -पोस्टर मेकिंग : प्रथम – राजेंद्र माने इंजिनीयरिंग कॉलेज, उत्तेजनार्थ -कीर लॉ कॉलेज,फाईन आर्ट – मातीकाम : उत्तेजनार्थ -राजेंद्र माने इंजिनीयरिंग कॉलेज,फाईन आर्ट – व्यंगचित्र : प्रथम – देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझायनिंग, उत्तेजनार्थ – राजेंद्र माने इंजिनीअरिंग कॉलेज. फाईन आर्ट – रांगोळी : प्रथम – कीर लॉ कॉलेज, द्वितीय – देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझायनिंग, उत्तेजनार्थ -लांजा कॉलेज. फाइन आर्ट – मेहंदी डिझाईन : प्रथम – लांजा कॉलेज, द्वितीय – आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज आणि एस. पी. हेगशेट्ये कॉलेज, तृतीय – मोहिनी मुरारी चाफे कॉलेज आणि देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझायनिंग, उत्तेजनार्थ – फिनोलेक्स अॅकॅडमी.
या फेरीतील विजेत्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली असून युवा महोत्सवाची अंतिम फेरी ८ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत मुंबई विद्यापीठात होणार आहे.
प्राथमिक फेरीचे बक्षीस वितरण मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक नीलेश सावे, भारत शिक्षण मंडळ संस्थेच्या कार्याध्यक्षा नमिता कीर, भारत शिक्षण मंडळ संस्थेचे कार्यवाह सुनील वणजू, भारत शिक्षण मंडळ संस्था सदस्य विनायक हातखंबकर, रत्नागिरी जिल्हा समन्वयक डॉ. आनंद आंबेकर, सहसमन्वयक प्रा. ताराचंद ढोबळे, एस. पी. हेगशेट्ये कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एन. गवाळे, लोकनेते श्यामराव कॉलेजचे प्राचार्य प्रमोद वारीक, भारत शिक्षण मंडळाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख सहा. प्रा. ऋतुजा भोवड यांच्या उपस्थितीत झाला.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

