माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन

लातूर : माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर यांचे आज (१२ डिसेंबर) सकाळी साडेसहाच्या सुमारास लातूरमध्ये निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थामुळे दीर्घ काळ त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. ‘देवघर’ या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रथम १९७३मध्ये लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांनी राज्य सरकारमध्ये विविध मंत्रिपदे भूषवली. पुढे लोकसभेचे सभापतिपद, तसेच केंद्र सरकारमधील अनेक मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली. चाकूर (लातूर) येथील प्रभावी काँग्रेस नेते म्हणून त्यांची ओळख होती. लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी सात वेळा विजय मिळवला. २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांनी राज्यसभेतून गृहमंत्रिपदासह विविध पदे सांभाळली.

– केंद्रीय गृहमंत्री (२००४–२००८)
– लोकसभेचे १०वे सभापती (१९९१–१९९६)
– पंजाबचे राज्यपाल व चंडीगडचे प्रशासक (२०१०–२०१५)
– महाराष्ट्र विधानसभेचे पाचवे अध्यक्ष

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply