नाणीजचे माजी सरपंच नारायण सावंत यांचे मरणोत्तर देहदान

रत्नागिरी : नाणीज (ता. रत्नागिरी) येथील माजी सरपंच नारायण सावंत यांनी आज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मरणोत्तर देहदान केले. हे महाविद्यालयातील सोळावे देहदान आहे.

नारायण शिवराम सावंत (वय – ९२ वर्षे, रा.- नाणीज, ता. रत्नागिरी) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले.

कै. सावंत नाणीज ग्रामपंचायतीत २५ वर्षे सरपंच व २५ वर्षे पोलीस पाटील होते. आपल्या जीवनातील मोठा काळ त्यांनी समाजासाठी दिला. त्याशिवाय २६ वर्षे गावप्रमुख, नाणीज पंचक्रोशीत गरजूंना मोफत वैद्यकीय सेवा दिली, जिल्हाधिकारी कार्यालयात मोडीलिपी भाषांतर करून देण्यासाठी ते विनामोबदला काम करत होते. ग्रामपंचायत प्रशासक म्हणून काम करताना राज्यातील पहिले गाव म्हणून नाणीज ग्रामपंचायतीत घरकुल योजना व कुटुंबकल्याण योजना तसेच शासकीय नळपाणी योजना शासनामार्फत प्रभावीपणे राबविल्या. याच कामाची दखल म्हणून त्यांना शासनाकडून विशेष पुरस्कार देण्यात आला होता.

त्यांच्या मरणोत्तर देहदानाच्या वेळी नाणीज पोलीस पाटील नितीन कांबळे, संदीप सरफरे, श्रीकांत सावंत, अशोक सावंत, गणेश सावंत, गणपत गुरव, संदेश सावंत, अशोक सावंत, प्रवीण सुर्वे, विशाल सरफरे, विकास सरफरे, मकरंद सावंत, सावंत, सूर्यकांत सावंत व एम. बी. कांबळे उपस्थित होते .

या देहदान प्रकियेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव व शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर,भूमी पारकर, कर्मचारी मिथिलेश मुरकर, राज पेडणेकर, मिहिर लोंढे यांनी काम पाहिले.

कै. सावंत यांच्या पश्चात त्यांचे पुतणे प्रफुल्ल सावंत व महेश सावंत आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply