Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

कुडाळजवळ वंदे भारत एक्स्प्रेस गुरांना धडकली; कोकण रेल्वेची वाहतूक साडेतीन तास ठप्प

Advertisements

कुडाळ : वंदे भारत एक्स्प्रेस गुरांना धडकून झालेल्या अपघातानंतर विस्कळीत झालेली कोकण रेल्वेमार्गावरची वाहतूक साडेतीन तासांनी सुरळीत झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ आणि सिंधुदुर्ग स्थानकादरम्यान आज (नऊ फेब्रुवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास अचानक बैल आणि म्हैस रुळावर आली. मडगावच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची धडक त्यांना बसली. त्यात त्या गुरांचा मृत्यू झाला. एक जनावर रेल्वेच्या ओव्हरहेड विद्युत खांबाला धडकल्याने तो खांब वाकला आणि विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे कुडाळपासून मडगावच्या दिशने जाणाऱ्या सर्व गाड्या जागीच थांबल्या. वंदे भारत एक्स्प्रेस डिझेल इंजिन लावून हलवण्यात आली. त्यानंतर विद्युतवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली आणि तब्बल साडेतीन तासांनी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक पुन्हा सुरू झाली. वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेक रेल्वेगाड्या कुडाळ, झाराप, सावंतवाडी, कणकवली स्थानकावर थांबवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version