२४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात १५७, तर सिंधुदुर्गात १४१ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आजही (ता. ४) वाढला आहे. आज सायंकाळपर्यंतच्या २४ तासांतील आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार नवे १५७ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आजच्या अहवालानुसार रत्नागिरी, चिपळूण, खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर करोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आजअखेर ४५२९ एवढी झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही १४१ नवे रुग्ण सापडल्याने तेथील करोनाबाधितांची एकूण संख्या १६२५ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
आजच्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – गुहागर १०, चिपळूण २०, रत्नागिरी ३९, लांजा १ (एकूण ७०). रॅपिड अँटीजेन टेस्ट – संगमेश्वर १०, खेड २८, गुहागर ११, चिपळूण १०, रत्नागिरी २६, लांजा २. (एकूण ८७).

आज ४७ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यांचा तपशील असा – रत्नागिरी ३, कळंबणी २, दापोली १, शिवश्री हॉस्पिटल, रत्नागिरी (पेड) ४, मंडणगड ३, केकेव्ही, दापोली ७, सामाजिक न्याय भवन, रत्नागिरी ३, घरडा ५, मंदार एज्युकेशन सोसायटी ४, माटे हॉल, चिपळूण १५. आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील २९३० जण करोनामुक्त झाले आहेत.

आजअखेर संस्थात्मक विलगीकरणात ७३६ जण आहेत, तर ११४ जण गृह विलगीकरणामध्ये आहेत.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (४ सप्टेंबर) आणखी १४१ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १६२५ झाली आहे. अद्याप ३२४ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत ८३५ जण करोनावर मात करून घरी गेले असून, सध्या ७६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील २४ जणांचा करोनाने बळी घेतला आहे. सध्या जिल्ह्यात २१९ कंटेन्मेंट झोन असून, ९२८४ व्यक्ती विलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १५ हजार ४६९ जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १६२५ अहवाल पॉझिटिव्ह आले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply