रत्नागिरीत २४ तासांत २०७ नवे करोनाबाधित; सिंधुदुर्गात १३२ जणांची वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आज (ता. ५) सलग तिसऱ्या दिवशीही वाढला आहे. आज सायंकाळपर्यंतच्या २४ तासांतील आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार गेल्या २४ तासांत २०७ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. रत्नागिरी तालुक्यात आज ५४ बाधित रुग्ण सापडले. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४७३६ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३२ नवे रुग्ण आढळल्याने तेथील एकूण रुग्णसंख्या १७५७ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
प्रशासन आणि आरोग्य विभागाने रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांत, तसेच बाजारपेठेत करोनाच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामध्ये व्यापारी, व्यावसायिकांचाही समावेश आहे.

आजच्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर -गुहागर १३, चिपळूण २, रत्नागिरी २१, लांजा ५, खेड १३, संगमेश्वर ४४, राजापूर ९. (एकूण १०७). रॅपिड अँटीजेन टेस्ट – संगमेश्वर ३, खेड १९, गुहागर १३, चिपळूण २८, रत्नागिरी ३३, लांजा ४, एकूण १००.

आज १०६ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत २९७७ जण करोनामुक्त झाले आहेत. बरे होणाऱ्यांची ही टक्केवारी ६२.८५ टक्के आहे.

आज आणखी एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या १४२ झाली असून, हे प्रमाण २.९ टक्के आहे.

आजअखेर संस्थात्मक विलगीकरणात ९०४ जण आहेत, तर गृह विलगीकरणात असलेल्यांची संख्या ५५४१ आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १३२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १७५७वर पोहोचली आहे. अद्याप २९७ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत ८४९ जणांनी करोनावर मात केली असून, २४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ८८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या विलगीकरणात ९२२० व्यक्ती असून, जिल्ह्यात २१३ कंटेन्मेंट झोन आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply