रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. ८) नव्या १०६ करोनाबाधितांची नोंद झाली असून, जिल्ह्यातील करोनाबाधितांनी पाच हजाराचा आकडा ओलांडला आहे. आजअखेर एकूण बाधितांची संख्या ५०६७ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या १९८५ झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
आजच्या पॉझिटिव्ह १०६ रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – मंडणगड १, चिपळूण २, रत्नागिरी १९. (एकूण २२). रॅपिड अँटीजेन टेस्ट – मंडणगड १, खेड २०, गुहागर १३, चिपळूण १५, रत्नागिरी ५६, राजापूर १. (एकूण ८४). जिल्ह्यातील एकूण रुग्ण ५०६७.
आज ६६ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील ३१२६ जण करोनामुक्त झाले आहेत. सध्या १८७ जण गृह विलगीकरणात आहेत.
आज दोघा पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील ५९ वर्षांचा रुग्ण रत्नागिरीचा, तर ७३ वर्षांचा रुग्ण संगमेश्वरचा आहे. तालुकानिहाय मृतांची आकडेवारी अशी – मंडणगड २, खेड १७, दापोली २२, चिपळूण ३४, गुहागर ४, संगमेश्वर १४, रत्नागिरी ४५, लांजा ५, राजापूर ८ (एकूण १५१).
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी ७६ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता १९८५ झाली आहे. आतापर्यंत ९७१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप २९७ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ३० जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ८८४२ व्यक्ती क्वारंटाइन आहेत.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
