दासबोधातील श्री गणेशस्तवन (श्लोक २२वा)

भाद्रपद कृ. सप्तमी, शके १९४२

॥ श्रीराम ॥
स्थिरता नाही येक क्षण ।
चपळाविषईं मूर्ति अग्रगण ।
साजिरी मूर्ति सुलक्षण ।
लावण्यखाणी ॥ २२॥

अर्थ : शरीराने स्थूल दिसणारा गणपती क्षणभरही स्वस्थ नसतो. चपळपणात तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. सौंदर्याची खाणच अशी त्याची मूर्ती मोठी सुलक्षणी आणि सुबक आहे.

…….

१९ ऑगस्ट २०२०पासून भाद्रपद महिना सुरू झाला आहे. हा महिना गणेशोत्सवासाठी ओळखला जातो. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. त्यात ३० श्लोक आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने, त्यातील एकेक ओवी महिनाभर दररोज कोकण मीडियावर प्रसिद्ध केली जात आहे. सोबत त्याचा सोप्या भाषेतील अर्थही देण्यात येत आहे. गणेशस्तवनातील आधीचे श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

……….

एकाच ओवीत उलट आणि सुलट या पद्धतीने श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या चरित्रांचे वर्णन करणारा राघवयादवीयम् हा अद्भुत संस्कृत श्लोकसंग्रह आणि त्याचा मराठी अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply