रत्नागिरीत करोनाबाधितांचा उच्चांक; एकाच दिवशी २२२ पॉझिटिव्ह; सिंधुदुर्गात ७४ नवे रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. १३) एकाच दिवशी २२२ करोनाबाधित रुग्ण आढळले असून, हा आजवरचा उच्चांक आहे. सिंधुदुर्गात आज ७४ नवे रुग्ण सापडले.

रत्नागिरीतील परिस्थिती
आज सापडलेल्या रुग्णांचा चाचणीनिहाय तपशील असा – आरटीपीसीआर – गुहागर २, चिपळूण १६, रत्नागिरी २३, लांजा ५, राजापूर १४ (एकूण ६०). रॅपिड अँटीजेन टेस्ट – दापोली १, खेड ११, गुहागर १९, चिपळूण ४७, संगमेश्वर ४, रत्नागिरी ७५, लांजा ३, राजापूर २ (एकूण १६२). आज करोनामुळे मरण पावलेल्या एकाची रुग्णाची नोंद झालेली नाही.

दरम्यान, सध्या ३४९ जण गृह विलगीकरणात असून, आज ७३ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१३ सप्टेंबर) आणखी ७४ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता २४२२ झाली आहे. आतापर्यंत ११८० जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १२०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप ५३९ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ४० जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ८५०१ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात ४५३६ व्यक्ती आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply