रत्नागिरीत ६३, तर सिंधुदुर्गात ८० नव्या करोनाबाधितांची नोंद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२२ सप्टेंबर) ६३ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ६८३२ झाली आहे. सिंधुदुर्गात आज ८० नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण संख्या ३१६५ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज (२२ सप्टेंबर) ६३ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ६८३२ झाली आहे.

आजच्या रुग्णांचा चाचणीनिहाय तपशील असा – आरटीपीसीआर – संगमेश्वर ५, रत्नागिरी ९, लांजा ९. (एकूण २३). रॅपिड अँटिजेन टेस्ट – खेड – ४, गुहागर – ३, चिपळूण ५, रत्नागिरी २१, लांजा ७. (एकूण ४०).

आज रत्नागिरी जिल्ह्यातील १६४ रुग्णांना करोनावर मात केल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत बऱ्या झालेल्या जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ५०८० झाली आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ७४.३५ टक्के आहे.

आज पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या २२५ झाली आहे. जिल्ह्यातील मृत्युदर ३.२९ टक्के आहे.

आज ज्या मृतांची नोंद झाली, त्यात रत्नागिरी तालुक्यातील ७३ वर्षीय महिला, तसेच गुहागर तालुक्यातील ६० वर्षांचा पुरुष आणि गुहागर तालुक्यातील ७० वर्षांचा पुरुष यांचा समावेश आहे. तसेच, रत्नागिरीतील ४८ वर्षांचा पुरुष आणि संगमेश्वरातील ७० वर्षांचा पुरुष यांचाही मृतांमध्ये समावेश आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – रत्नागिरी – ६६, खेड – ३८, गुहागर – ८, दापोली – २५, चिपळूण – ५२, संगमेश्वर – २०, लांजा – ६, राजापूर – ८, मंडणगड – २ (एकूण २२५)

सध्या रत्नागिरी जिल्ह्यात १४०७ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यापैकी ५८८ जण गृह विलगीकरणात आहेत.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२२ सप्टेंबर) आणखी ८० व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ३१६५ झाली आहे. आतापर्यंत १९९८ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १०९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप ५८५ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ६८ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ८०५५ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात १२ हजार ८०८ व्यक्ती आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply