रत्नागिरी जिल्ह्यात ७१, तर सिंधुदुर्गात १३३ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२३ सप्टेंबर) ७१ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ६९०३ झाली आहे. सिंधुदुर्गात १३३ नवे करोनाबाधित सापडल्याने एकूण संख्या ३२९८ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरीतील आजच्या रुग्णांचा चाचणीनिहाय तपशील असा – आरटीपीसीआर – मंडणगड ३, दापोली २, खेड २, चिपळूण १५, रत्नागिरी ७, लांजा २, राजापूर ४. (एकूण ४१). रॅपीड अँटिजेन टेस्ट – खेड – १, गुहागर ९, चिपळूण ५, रत्नागिरी १०, लांजा ५. (एकूण ३०).

रत्नागिरी जिल्ह्यात आज सहा रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यापैकी तिघांचा मृत्यू खासगी रुग्णालयांत, तर तिघांचा शासकीय रुग्णालयात झाला. एकाचा मृत्यू १५ सप्टेंबरला, तिघांचा मृत्यू २२ सप्टेंबरला, तर दोघांचा मृत्यू काल झाला आहे. जिल्ह्यात करोनामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या २३१ झाली असून जिल्ह्यातील मृत्युदर ३.३४ टक्के आहे.

आज ज्या मृतांची नोंद झाली, ते सर्व पुरुष रुग्ण आहेत. त्यांचा तपशील असा – खेड वय ५८, दापोली वय ८२, संगमेश्वर वय ६३, रत्नागिरी वय ४५, रत्नागिरी वय ७५, चिपळूण वय ७२. मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – रत्नागिरी – ६८, खेड – ३९, गुहागर – ८, दापोली – २६, चिपळूण – ५३, संगमेश्वर – २१, लांजा – ६, राजापूर – ८, मंडणगड – २ (एकूण २३१)

आज जिल्ह्यातील ९५ रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे आजपर्यंत बऱ्या झालेल्या जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ५१७५ झाली आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.९६ टक्के आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात १३४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२३ सप्टेंबर) आणखी १३३ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ३२९८ झाली आहे. आतापर्यंत २०७२ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ११५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप २९१ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ६८ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ८०२७ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात १२ हजार ८३६ व्यक्ती आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply