माझे कुटुंब माझी जबाबदारी : सिंधुदुर्गात २६ हजारांहून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण

सिंधुदुर्गनगरी : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने महाराष्ट् शासनाने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या महत्त्वाकांक्षी योजनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार सुरुवात झाली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात २१ सप्टेंबर २०२० च्या प्राप्त अहवालानुसार आतापर्यंत २६ हजार ५२७ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेसाठी जिल्ह्यात एकूण ५६९ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये एकूण १७३२ डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकांकडे ३८९ पल्स ऑक्सिमीटर असून, ४३७ थर्मल स्कॅनर गन आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २२ हजार ३२९ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून तालुकानिहाय सर्वेक्षण पूर्ण झालेल्या कुटुंबांची संख्या अशी : वैभववाडी – २ हजार ९९४, कणकवली – ६ हजार ७८७, देवगड – १ हजार ७७५, मालवण – १ हजार ९३९, कुडाळ -९७७, वेंगुर्ले – ५ हजार ९२१, सावंतवाडी १ हजार ६७६, दोडामार्ग – २६०.

शहरी भागातील एकूण ४१९८ कुटुंबांना भेटी देण्यात आल्या असून नगरपालिका, नगरपंचायतनिहाय संख्या अशी : सावंतवाडी-२६४, मालवण-४९१, वेंगुर्ले-३८०, कणकवली – ५९२, कुडाळ – १ हजार ९०४, कसई-दोडामार्ग- २२५, वाभवे-वैभववाडी – ४२, देवगड -जामसंडे- ३४० कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत ५६९ आरोग्य तपासणी पथकांद्वारे जिल्ह्यातील २६ हजार ५२७ कुटुंबांमधील एक लाख ३५ हजार ७३८ सदस्यांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच या मोहिमेअंतर्गत इतर रोग असणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply