महिलांसाठी हिरकणी कविता व्हिडिओ सादरीकरण स्पर्धेचे आयोजन

दापोली : येथील कलाकारी क्रिएशन यू-ट्यूब चॅनेल आणि मित्रांच्या कविता यांच्यातर्फे फक्त महिलांसाठी हिरकणी कविता व्हिडिओ सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेकरिता येत्या २५ सप्टेंबरपर्यंत व्हिडिओ पाठवायचे आहेत.

स्पर्धेकरिता वयोगट, विषय, काव्यप्रकार यांचे कोणतेही बंधन नाही. कवितेचा व्हिडिओ जास्तीत जास्त ३ मिनिटांचा असावा. त्याहून अधिक लांबीचा व्हिडिओ बाद ठरविण्यात येईल. मोबाइल आडवा धरून व्हिडिओचे शूटिंग करावे. आवाज सुस्पष्ट आणि व्हिडिओ क्लिअर शूट केलेला असावा. कवितेचा व्हिडिओ २५ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पांडुरंग जाधव यांच्या ९८९२८१२२१८ या व्हॉट्सअॅपवर पाठवावा. अधिक माहितीसाठी याच क्रमांकावर सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत संपर्क साधता येईल.

स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये होईल. प्राप्त झालेल्या व्हिडिओंमधून नऊ व्हिडिओ दुसऱ्या फेरीसाठी निवडले जातील. हे ९ व्हिडिओ २, ३, ४ ऑक्टोबर रोजी दिवशी दररोज तीन असे कलाकारी क्रिएशन या यू-ट्यूब चॅनेलवर प्रसारित होतील. त्यातून सर्वाधिक व्ह्यूजच्या आधारे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक निवडले जातील. सर्व विजेत्यांना डिजिटल प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तू दिली जाईल. इतर सहा व्हिडिओंना डिजिटल प्रमाणपत्र दिले जाईल. व्हिडिओ करताना स्वतःचे नाव, कवितेचे शीर्षक सांगावे आणि ‘कलाकारी क्रिएशन आणि मित्रांच्या कविता आयोजित कलाकारी- हिरकणी या स्पर्धेसाठी माझी ही स्वरचित कविता सादर करत आहे,’ असे नमूद करावे. त्यानंतरच कविता म्हणावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply