रत्नागिरी जिल्ह्यात ८५, तर सिंधुदुर्गात करोनाचे ३७ नवे रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२८ सप्टेंबर) करोनाचे नवे ८५ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ७२६७ झाली आहे. आज करोनामुक्तांचा दर काहीसा कमी झाला असून, मृत्युदरातही किंचित वाढ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ३७ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णांची संख्या आता ३६७९ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
आजच्या रुग्णांचा चाचणीनिहाय तपशील असा – आरटीपीसीआर – गुहागर ७, चिपळूण २४, संगमेश्वर १०, रत्नागिरी २२, राजापूर ३ (एकूण ७५). रॅपीड अँटिजेन टेस्ट – चिपळूण १, रत्नागिरी ८, लांजा १ (एकूण १०).

रत्नागिरीतील ५० रुग्णांना आज बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत करोनावर मात केलेल्या रुग्णांची एकूण संख्या ६०६६ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर कालच्या तुलनेत किंचित घटून तो आज ८३.४७ टक्के झाला आहे.

करोनाबाधित एक महिला आणि पाच पुरुष असा सहा रुग्णांचा मृत्यू आज नोंदवला गेला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या २५६ झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर किंचित वाढला आहे. तो आता ३.५२ टक्के झाला आहे. आज नोंद झालेल्या मृतांपैकी चौघे जण खासगी रुग्णालयात, तर दोघे शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. दापोलीतील ७८ वर्षीय पुरुषाचे निधन १३ सप्टेंबर रोजी झाला होता. त्याची नोंद आज झाली. इतर तपशील असा – रत्नागिरी वय ७०, पुरुष (मृत्यू २७ सप्टेंबर), लांजा वय ७०, पुरुष (मृत्यू २७ सप्टेंबर), खेड वय ५२, पुरुष (मृत्यू २८ सप्टेंबर), खेड वय ४९, महिला (मृत्यू २७ सप्टेंबर), चिपळूण वय ७०, पुरुष (मृत्यू २८ सप्टेंबर.)

तालुकानिहाय मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ७१, खेड ४५, गुहागर ८, दापोली २८, चिपळूण ६२, संगमेश्वर २३, लांजा ८, राजापूर ९, मंडणगड २ (एकूण २५६).

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२८ सप्टेंबर) आणखी ३७ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ३६७९ झाली आहे. आतापर्यंत २४८२ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १११२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप ८७ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ८५ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ३४८४ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात १२ हजार ९७६ व्यक्ती आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply