देवरूख : भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हा सांस्कृतिक आघाडीतर्फे आयोजित केलेल्या देशभक्तिपर गीतगायन स्पर्धेत दोन्ही गटांत देवरूखच्या गायिकांनी पहिला क्रमांक पटकावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहातील सांस्कृतिक उपक्रम म्हणून देशभक्तिपर गीतगायन ऑनलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सोळा वर्षांखालील शालेय आणि सोळा वर्षांवरील खुला गट अशा दोन गटांत ही स्पर्धा झाली. लहान गटात ३०, तर खुल्या गटात २७ जणांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी मुंबईतील प्रसिद्ध हार्मोनियम वादक निरंजन लेले आणि प्रसिद्ध गायक धनंजय म्हैसकर यांनी ऑनलाइन परीक्षक म्हणून काम पाहिले. भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हा सांस्कृतिक आघाडीच्या जिल्हा संयोजिका सौ. मुग्धा भट-सामंत आणि शहरप्रमुख हेरंब जोगळेकर यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला.
गुणानुक्रमे सविस्तर निकाल असा – १६ वर्षांखालील (लहान) गट : श्रेया भागवत (देवरूख), देवी लवेकर (रत्नागिरी), श्रिया जोशी (दापोली). उत्तेजनार्थ : स्वरा भागवत (रत्नागिरी), निधी फणसळकर (रत्नागिरी), रसिका वायंगणकर (राजापूर).
१६ वर्षां वरील (खुला) गट : सुलोचना प्रभू (देवरूख), गौतमी वाडकर (संगमेश्वर), ईशानी पाटणकर (रत्नागिरी). उत्तेजनार्थ : लीना खामकर (रत्नागिरी), वैष्णवी जोशी (रत्नागिरी), रवींद्र सप्रे (देवरूख).
विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरणाबाबत स्वतंत्रपणे कळविले जाणार आहे.