रत्नागिरीत ६४, तर सिंधुदुर्गात ८० नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२९ सप्टेंबर) करोनाचे नवे ६४ रुग्ण आढळले. कालच्या तुलनेत आज नव्या बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ७३३१ झाली आहे. आज करोनामुक्तांचा दरही वाढला आहे. सिंधुदुर्गात आज ८० नव्या करोनाबाधितांची नोंद झाली.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज १५० रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६२१६ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर कालच्या ८३.४७ टक्क्यांवरून आज ८४.७९ टक्क्यांपर्यंत गेला आहे.

आजच्या रुग्णांचा चाचणीनिहाय तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी १०. (एकूण १०). रॅपीड अँटिजेन टेस्ट – खेड २, चिपळूण ११, संगमेश्वर १६, रत्नागिरी २५. (एकूण ५४).

आज करोनाच्या पाच रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या २६१ झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर किंचित वाढून ३.५६ टक्के झाला आहे. आज नोंद झालेल्या पाच मृतांपैकी दोघे खासगी रुग्णालयात, तर तिघे शासकीय रुग्णालयात काल (दि. २८ सप्टेंबर) मरण पावले. त्यांची नोंद आज झाली. पाचपैकी एक महिला रुग्ण आहे. मृतांचा तपशील असा – रत्नागिरी वय ७० आणि वय ५८ (दोन्ही पुरुष), चिपळूण वय ४७, पुरुष, लांजा वय ५५, पुरुष, गुहागर वय ८०, महिला.

तालुकानिहाय मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ७२, खेड ४५, गुहागर ९, दापोली २८, चिपळूण ६४, संगमेश्वर २३, लांजा ९, राजापूर ९, मंडणगड २ (एकूण २६१).

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२९ सप्टेंबर) आणखी ८० व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ३७५९ झाली आहे. आतापर्यंत २५६७ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ११०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप १८९ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ८८ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ३६२४ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात १३ हजार तीन व्यक्ती आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply