रत्नागिरीत ७७, तर सिंधुदुर्गात ५३ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (३० सप्टेंबर) करोनाचे नवे ७७ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ७४०८ झाली आहे. सिंधुदुर्गात आज ५३ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३८१२ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज १०९ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३२५ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर कालच्या ८४.७९ टक्क्यांवरून आज ८५.३८ टक्क्यांपर्यंत गेला आहे. सध्या ७०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजच्या रुग्णांचा चाचणीनिहाय तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी २०, चिपळूण ५, खेड ३, गुहागर ७, राजापूर ३. (एकूण ३८). रॅपिड अँटिजेन टेस्ट – खेड ४, गुहागर ५, चिपळूण १६, संगमेश्वर १, रत्नागिरी १३. (एकूण ३९). (दोन्ही मिळून ७७)

आज करोनाच्या दोन रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या २६३ झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.५५ टक्के झाला आहे. आज नोंद झालेल्या दोन मृतांपैकी एक जण खासगी रुग्णालयात, तर एक शासकीय रुग्णालयात मरण पावला. २६ सप्टेंबर रोजी चिपळूणमधील ७८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तिची नोंद आज झाली. २९ सप्टेंबरला रत्नागिरीतील ८० वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू झाला.

तालुकानिहाय मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ७३, खेड ४५, गुहागर ९, दापोली २८, चिपळूण ६५, संगमेश्वर २३, लांजा ९, राजापूर ९, मंडणगड २ (एकूण २६३).

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (३० सप्टेंबर) आणखी ५३ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ३८१२ झाली आहे. आतापर्यंत २६४८ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १०७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप १७९ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ९३ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ३६५१ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात १३ हजार ४३ व्यक्ती आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply