रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दोन ऑक्टोबर) करोनाचे नवे ६७ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ७५६६ झाली आहे. सिंधुदुर्गात आज नवे ६४ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ३९२८ झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – गुहागर ३, चिपळूण १२, रत्नागिरी १८, राजापूर २ (एकूण ३५). रॅपिड अँटिजेन टेस्ट – खेड ३, गुहागर ५, चिपळूण ५, रत्नागिरी १९ (एकूण ३२) (दोन्ही मिळून ६७)
आज ८९ रुग्णांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत ६४५५ जणांनी करोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ८५.३१ टक्के झाला आहे. सध्या ७२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ३६ हजार ८७५ जणांच्या चाचण्या झाल्या आहेत.
आज करोनाच्या दोन रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या २६९ झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.५५ टक्के राहिला आहे.
आज नोंद झालेल्यापैकी ५८ वर्षांच्या चिपळूणमधील एका पुरुषाचा मृत्यू ३१ ऑगस्ट रोजी झाला होता. त्याची नोंद आज झाली. रत्नागिरीतील ८० वर्षांच्या एका महिलेचा मृत्यू आज झाला. यापैकी एक मृत्यू शासकीय रुग्णालयातील, तर एक मृत्यू खासगी रुग्णालयातील आहे.
तालुकानिहाय मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ७४, खेड ४५, गुहागर १०, दापोली २९, चिपळूण ६६, संगमेश्वर २४, लांजा ९, राजापूर १०, मंडणगड २ (एकूण २६९).
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२ ऑक्टोबर) आणखी ६४ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ३९२८ झाली आहे. आतापर्यंत २८४८ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप १९३ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ९६ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ३६२६ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात १३ हजार ८४ व्यक्ती आहेत.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड