रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१२ ऑक्टोबर) करोनाचे नवे ३५ रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ८०३९ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५ रुग्ण आढळल्याने एकूण संख्या ४४०४ झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (१२ ऑक्टोबर) आणखी ४८ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७१६५ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ८९.१२ टक्के आहे.
जिल्ह्यात आज नवे ३५ रुग्ण आढळले. त्यापैकी १० आरटीपीसीआर चाचणीनुसार, तर २५ जण रॅपिड अँटिजेन टेस्टनंतर करोनाबाधित असल्याचे नक्की झाले. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – गुहागर आणि रत्नागिरी प्रत्येकी चार, चिपळूण आणि राजापूर प्रत्येकी एक. रॅपिड अँटिजेन टेस्ट – मंडणगड १, दापोली ४, खेड ७, चिपळूण ४, रत्नागिरी ४, लांजा ३, राजापूर २. जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ८०३९ झाली आहे. बाधितांचा दर १५.९१ टक्के आहे.
जिल्ह्यात आज दोघा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दोघेही रुग्ण चिपळूणचे आहेत. त्यामध्ये ७३ वर्षीय महिला आणि ६३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता २६५ झाली असून जिल्ह्याचा ३.६६ हा मृत्यूदर आजही कायम राहिला आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्गात आज (१२ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार आज १८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ३ हजार ५२५ झाली आहे. सध्या जिल्ह्यात ७६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज फक्त ५ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ४ हजार ४०४ झाली आहे. आज देवगड आणि कणकवली तालुक्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्याची एकूण संख्या ११४ झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

