रत्नागिरीत ८, तर सिंधुदुर्गात ३ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२६ ऑक्टोबर) आठ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८३८३ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज तीन नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ४७५९ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (२६ ऑक्टोबर) आठ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७७४२ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९२.३५ टक्के आहे.

जिल्ह्यात आज नवे आठ रुग्ण आढळले आहेत. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – गुहागर २, रत्नागिरी ३ (एकूण ५). रॅपिड अँटिजेन टेस्ट – चिपळूण १, रत्नागिरी २ (एकूण ३) (दोन्ही मिळून ८)

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८३८३ झाली आहे. बाधितांचा दर १५.०४ टक्के आहे. सध्या २३८ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या ३१३ असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.७३ टक्के आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या – रत्नागिरी ८५, खेड ५०, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७४, संगमेश्वर ३२, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२६ ऑक्टोबर) तीन व्यक्तींचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४७५९ झाली आहे. आतापर्यंत ४१३५ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १२६ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply