रत्नागिरीत २२, तर सिंधुदुर्गात २६ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२७ ऑक्टोबर) २२ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८४०५ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २६ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ४७८५ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (२७ ऑक्टोबर) १९ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७७६१ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९२.३३ टक्के आहे.

जिल्ह्यात आज नवे २२ रुग्ण आढळले आहेत. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – चिपळूण १, संगमेश्वर ३, रत्नागिरी १ (एकूण ५). रॅपिड अँटिजेन टेस्ट – दापोली ४, खेड १, गुहागर ५, चिपळूण १, रत्नागिरी ४, लांजा २ (एकूण १७) (दोन्ही मिळून २२)

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८४०५ झाली आहे. बाधितांचा दर १४.९० टक्के आहे. सध्या २३२ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या ३१३ असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.७२ टक्के आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या – रत्नागिरी ८५, खेड ५०, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७४, संगमेश्वर ३२, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२७ ऑक्टोबर) २६ व्यक्तींचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४७८५ झाली आहे. आज १९ जण करोनामुक्त झाले असून, आतापर्यंत ४१५४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १२६ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply