रत्नागिरीत करोनाचे नवे सात, तर सिंधुदुर्गात २१ रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (३१ ऑक्टोबर) करोनाचे नवे केवळ सात, तर सिंधुदुर्गात त्याच्या तिप्पट म्हणजे २१ रुग्ण आढळले. दोन्ही जिल्ह्यांत नव्या मृतांची नोंद झालेली नाही.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (३१ ऑक्टोबर) आढळलेल्या नव्या ७ रुग्णांचा तालुकानिहाय आणि चाचणीनिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – रत्नागिरी २ (एकूण २). रॅपिड अँटिजेन टेस्ट – चिपळूण २, संगमेश्वर १, रत्नागिरी २. (एकूण ५).

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८४४९ झाली आहे. बाधितांचा दर १४.७७ टक्के आहे. सध्या १४६ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात आज ३१ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७८८० झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९३.२६ टक्के आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. आतापर्यंत ३१६ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा ३.७४ टक्के मृत्युदर कायम आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (३१ ऑक्टोबर) नव्या २१ व्यक्तींचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४९०१ झाली आहे. आज १९ जण करोनामुक्त झाले असून, आतापर्यंत ४२६१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ५१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १२६ जण करोनामुळे मरण पावले असून, आज त्यात भर पडलेली नाही.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply