रत्नागिरीतील सक्रिय करोनाबाधितांची संख्या प्रथमच १००पेक्षा कमी; सिंधुदुर्गात ४१९ सक्रिय रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (चार नोव्हेंबर) १८ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८४९४ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ११ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ४९६१ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय म्हणजेच उपचार सुरू असलेल्या करोनाबाधितांची संख्या गेल्या काही महिन्यांत वाढत गेल्यानंतर आज प्रथमच १००पेक्षा कमी झाली आहे, ही दिलासादायक बाब आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (चार नोव्हेंबर) २६ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७९७३ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९३.८६ टक्के आहे.

जिल्ह्यात आज नवे १८ रुग्ण आढळले आहेत. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – खेड ३, चिपळूण २, संगमेश्वर १, रत्नागिरी १, लांजा २ (एकूण ९). रॅपिड अँटिजेन टेस्ट – दापोली २, रत्नागिरी ५, लांजा २ (एकूण ९) (दोन्ही मिळून १८)

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८४९४ झाली आहे. बाधितांचा दर १४.७३ टक्के आहे. सध्या ९७ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. आतापर्यंत ३१७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.७३ टक्के आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या – रत्नागिरी ८७, खेड ५०, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७५, संगमेश्वर ३३, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (चार नोव्हेंबर) ११ व्यक्तींचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४९६१ झाली आहे. आज ६२ जण करोनामुक्त झाले असून, आतापर्यंत ४४१५ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १२७ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply