रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी सहा नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (नऊ नोव्हेंबर) सहा नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८५३१ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज सहा नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ५००७ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (नऊ नोव्हेंबर) १३ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ८०६० झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९४.४७ टक्के आहे.

जिल्ह्यात आज नवे सहा रुग्ण आढळले आहेत. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – रत्नागिरी ४ (एकूण ४). रॅपिड अँटिजेन टेस्ट – रत्नागिरी २ (एकूण २) (दोन्ही मिळून ६)

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८५३१ झाली आहे. बाधितांचा दर १४.७३ टक्के आहे. सध्या ५९ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एका मृत्यूची नोंद झाली. खेड तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा सरकारी रुग्णालयात २९ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला होता. त्याची नोंद आज झाली. आतापर्यंत जिल्ह्यातील ३१८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.७२ टक्के आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या – रत्नागिरी ८७, खेड ५१, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७५, संगमेश्वर ३३, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (नऊ नोव्हेंबर) सहा व्यक्तींचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ५००७ झाली आहे. आतापर्यंत ४५५१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज मु. पो. गोळवण (ता. मालवण) येथील ५५ वर्षीय पुरुषाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १२८ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply