रत्नागिरीत १०, तर सिंधुदुर्गात २३ नव्या करोनाबाधितांची नोंद

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१२ नोव्हेंबर) १० नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८५६५ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २३ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ५०४२ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (१२ नोव्हेंबर) १२ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ८०८५ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९४.३९ टक्के आहे.

जिल्ह्यात आज नवे १० रुग्ण आढळले आहेत. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – संगमेश्वर ४ (एकूण ४). रॅपिड अँटिजेन टेस्ट – दापोली ३, खेड २, लांजा १ (एकूण ६) (दोन्ही मिळून १०)

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८५६५ झाली आहे. बाधितांचा दर १४.७३ टक्के आहे. सध्या ७१ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. आतापर्यंत जिल्ह्यातील ३१८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.७१ टक्के आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या – रत्नागिरी ८७, खेड ५१, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७५, संगमेश्वर ३३, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१२ नोव्हेंबर) २३ व्यक्तींचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ५०४२ झाली आहे. आज १६ जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण ४७६१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १३० जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. आधी मृत्यू झालेल्या दोघांची आज नोंद झाल्याने एकूण मृत्युसंख्या वाढली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply