Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरी जिल्ह्यात ५, सिंधुदुर्गात ४ नवे करोनाबाधित

Advertisements

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (बुधवारी) नवे ५ करोनाबाधित आढळले, १२ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ४ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ११ रुग्ण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार ४, तर अँटिजेन चाचणीनुसार १ रुग्ण निष्पन्न झाला. आरटीपीसीआरनुसार रत्नागिरीत २, तर दापोली आणि संगमेश्वरमध्ये प्रत्येकी १ आणि अँटिजेन चाचणीत लांजा येथे १ रुग्ण बाधित आढळला. त्यांच्यासह जिल्ह्यात सध्या १२१ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ५२ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत, तर सर्वाधिक ३६ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या नऊ हजार १९१ झाली आहे.

जिल्ह्यात आज १२ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या आठ हजार ७०९ झाली असून करोनामुक्तीचा हा दर ९४.७५ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ३२८ असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.५६ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार कोव्हीड-१९ च्या ११ जणांना घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५ हजार ४५५ झाली आहे. सध्या जिल्ह्यात २२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज ४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ५ हजार ८३९ एवढी झाली आहे. आज कोणाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्याची एकूण संख्या १५७ एवढीच असंल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version