Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरीत २५, तर सिंधुदुर्गात १३ जण करोनामुक्त

Advertisements

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी आज (रविवारी) २५ जण, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३ जण करोनामुक्त झाले. दोन्ही जिल्ह्यांत एकाही मृत्यूची नोंद आज झाली नाही.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार १२ (रत्नागिरी १२, खेड, गुहागर, संगमेश्वर प्रत्येकी १ आणि चिपळूण ७), तर अँटिजेन चाचणीनुसार गुहागर येथे ४ असे एकूण १२ रुग्ण आढळले. त्यांच्यासह जिल्ह्यात सध्या ७८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी २७ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत, या रुग्णांसह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या नऊ हजार २४६ झाली आहे.

जिल्ह्यात आज २५ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या आठ हजार ७९१ झाली असून करोनामुक्तीचा हा दर ९५.०७ टक्के आहे.

जिल्ह्यात आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची संख्या ३३० असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.५७ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार करोनाच्या १३ जणांना घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार ५२७ झाली आहे. सध्या जिल्ह्यात २१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज ८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ५ हजार ९०७ एवढी झाली आहे. आज कोणाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्याची एकूण संख्या १५७ एवढीच असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version