करोनाचे रत्नागिरीत १८, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२४ डिसेंबर) करोनाचे १८ नवे रुग्ण आढळले, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ नव्या रुग्णांची नोंद झाली. आज रत्नागिरीत ११ जण, तर सिंधुदुर्गात ३५ जण करोनामुक्त झाले.

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार १५ (रत्नागिरी ४, खेड १, गुहागर ६, चिपळूण १, लांजा २, राजापूर १), तर अँटिजेन टेस्टनुसार ३ (खेड, गुहागर आणि लांजा येथे प्रत्येकी १) असे एकूण १८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात सध्या १३९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात होम आयसोलेशनमध्ये असलेल्या ६४ जणांचा समावेश आहे, तर सर्वाधिक ४२ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या नऊ हजार १३० झाली आहे.

आज चाचणी घेतलेल्या आणखी १९४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. जिल्ह्यात आज ११ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आल्याने करोनामुक्त झालेल्यांची संख्या आठ हजार ६२२ झाली असून करोनामुक्तीचा हा दर ९४.४३ टक्के आहे.

आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण मृतांची संख्या ३२७ झाली असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.५८ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे १६ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या पाच हजार ८०६ झाली आहे. सध्या सक्रिय असलेले ३३६ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचारांखाली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या पाच हजार ३१३ झाली आहे. आतापर्यंत १५१ जणांचा मृत्यू नोंदविला गेला.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply