Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरीत ९, तर सिंधुदुर्गात १६ नवे करोनाबाधित

Advertisements

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२२ जानेवारी) करोनाचे नवे ९ रुग्ण आढळले, तर ६ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १६ नवे रुग्ण आढळले, तर १८ रुग्ण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार, रत्नागिरी आणि लांज्यात प्रत्येकी एक, तर चिपळूण तालुक्यात तीन बाधित रुग्ण आढळले. रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार, रत्नागिरीत दोन, तर दापोली आणि चिपळूण या तालुक्यांत प्रत्येकी एक रुग्ण आढळला. (दोन्ही मिळून एकूण ९). जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ९४४२ झाली आहे. आज आणखी २४५ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली; मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ६४ हजार ७४२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ९१ आहे. त्यातील सर्वाधिक ४१ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर १८ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जिल्ह्यात आज ६ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची संख्या ८९९१ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.२२ टक्के झाला आहे. आज जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३४२ एवढीच आहे. मृत्युदर ३.६२ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, आज १६ नवे करोनाबाधित आढळले, तर १८ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६१३६ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५७६६ झाली आहे. सध्या जिल्ह्यात २०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १६४ एवढी आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version