Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरीत १८, तर सिंधुदुर्गात ६ नवे करोनाबाधित

Advertisements

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (तीन फेब्रुवारी) करोनाचे नवे १८ रुग्ण आढळले, तर सहा जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नवे ६ रुग्ण आढळले, तर २८ रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज (तीन फेब्रुवारी) आरटीपीसीआर चाचणीनुसार, रत्नागिरी तालुक्यात एक, खेड आणि संगमेश्वर तालुक्यात प्रत्येकी दोन, तर चिपळूण तालुक्यात नऊ नवे बाधित रुग्ण सापडले. रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार, रत्नागिरी तालुक्यात एक, तर संगमेश्वर तालुक्यात तीन नवे बाधित रुग्ण आढळले. (दोन्ही मिळून १८) जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९५९९ झाली आहे. आज आणखी २८८ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली; मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७२ हजार ९७१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ११५ आहे. त्यातील सर्वाधिक ३७ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर ५४ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जिल्ह्यात आज ६ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९१०९ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.८९ टक्के झाला आहे. दोन फेब्रुवारीला चिपळूण तालुक्यातील ४९ वर्षीय पुरुष रुग्णाचा सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या ३५१ झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६५ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज (३ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, ६ नवे करोनाबाधित आढळले, तर २८ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६२६८ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५९०७ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची एकूण संख्या १६७ आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version