रत्नागिरीत आठ आणि सिंधुदुर्गात पाच नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (पाच फेब्रुवारी) करोनाचे नवे आठ रुग्ण आढळले, तर १४ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नवे पाच रुग्ण आढळले, तर १० रुग्ण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज (पाच फेब्रुवारी) आरटीपीसीआर चाचणीनुसार, खेड आणि चिपळूण तालुक्यात प्रत्येकी एक, तर लांजा तालुक्यात तीन नवे बाधित रुग्ण सापडले. रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार, रत्नागिरी तालुक्यात दोन नवे बाधित रुग्ण आढळले. तसेच, चिपळूण तालुक्यात एक नवा रुग्ण सापडला. (दोन्ही मिळून ८) जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९६१४ झाली आहे. आज आणखी २२६ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली; मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७३ हजार ४६१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १०७ आहे. त्यातील सर्वाधिक २३ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर ५२ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जिल्ह्यात आज १४ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९१४० झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.०७ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या ३५१ असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६५ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज (५ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, ५ नवे करोनाबाधित आढळले, तर १० जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६२८१ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५९१८ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची एकूण संख्या १६८ आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply