सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (५ मे) दुपारी १२ वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार नवे ४७४ करोनाबाधित आढळले. आज १४२ रुग्ण करोनामुक्त झाले, तर नऊजणांचा मृत्यू नोंदविला गेला.
सध्या जिल्ह्यात तीन हजार ७१९ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
आजच्या ४७४ नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता १४ हजार ७६५ झाली आहे. आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ५६, दोडामार्ग – ३१, कणकवली – ६९, कुडाळ – ९७, मालवण – ६१, सावंतवाडी – ९४, वैभववाडी – १५, वेंगुर्ले ५१.
जिल्ह्यात सर्वाधिक ७२३ सक्रिय रुग्ण कुडाळ तालुक्यात, तर त्याखालोखाल कणकवली तालुक्यात ६२५ रुग्ण आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड ४९२, दोडामार्ग २५८, मालवण ५८७, सावंतवाडी ४५४, वैभववाडी २१०, वेंगुर्ले ३१२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण ५८. सक्रिय रुग्णांपैकी ३२५ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी २८६ रुग्ण ऑक्सिजनवर तर ३९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
आज ९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ३७५ झाली आहे. आज कणकवली, मालवण आणि कुडाळ तालुक्यात प्रत्येकी २, तर देवगड, सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातील तालुकानिहाय मृत्यूची आजपर्यंतची एकूण संख्या अशी – देवगड ४२, दोडामार्ग – १०, कणकवली – ८९, कुडाळ – ५९, मालवण – ४९, सावंतवाडी – ६३, वैभववाडी – ३६, वेंगुर्ले – २५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २.
जिल्ह्यात कणकवलीतील बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह (६) आणि दोडामार्ग आयटीआय येथील कोविड केअर सेंटरमध्ये (३३) रुग्णांना दाखल करण्यासाठी बेड शिल्लक आहेत. इतरत्र बेड शिल्लक नाहीत.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
