रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (५ मे) नवे ६२७ करोनाबाधित आढळले, तर ६०८ जण करोनामुक्त झाले. एकूण २३ जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली.
जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचणीनुसार ४०४, तर रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार २२३ असे एकूण ६२७ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता २४ हजार ८४९ झाली आहे. आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून सहा हजार ५९३ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत.
आज आणखी एक हजार ९४ जणांची चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ३२ हजार ५०२ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
जिल्ह्यात आज ५०८ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची एकूण संख्या १७ हजार ५१८ झाली आहे. करोनामुक्तांची ही टक्केवारी ७०.४९ टक्के आहे.
जिल्ह्यात आज पूर्वीचे ६ आणि आजचे १७ अशा एकूण २३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ७३८ झाली असून मृत्युदर २.९६ टक्के आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
