सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० हजार ८२७ जण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (६ मे) दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १० हजार ८२७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात ३ हजार ८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३३८ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आजच्या ३३८ नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता १५ हजार १०३ झाली आहे. आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – २६, दोडामार्ग – १६, कणकवली – ७०, कुडाळ – ५०, मालवण – ४४, सावंतवाडी – ८३, वैभववाडी – ५, वेंगुर्ले ४१, जिल्ह्याबाहेरील – ३.

जिल्ह्यात ३ हजार ८७६ सक्रिय रुग्ण असून सर्वाधिक ७७० सक्रिय रुग्ण कुडाळ तालुक्यात, तर त्याखालोखाल कणकवली तालुक्यात ६४५ रुग्ण आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड ५१४, दोडामार्ग २६३, मालवण ६१४, सावंतवाडी ५१२, वैभववाडी १५३, वेंगुर्ले ३४४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण ६१. सक्रिय रुग्णांपैकी ३२० रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी २८६ रुग्ण ऑक्सिजनवर तर ३८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात नऊजणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ३८४ झाली आहे. आज देवगड, मालवण, सावंतवाडी आणि वैभववाडी तालुक्यात प्रत्येकी २ तर कुडाळ तालुक्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील तालुकानिहाय मृत्यूची आजपर्यंतची एकूण संख्या अशी – देवगड ४४, दोडामार्ग – १०, कणकवली – ८९, कुडाळ – ६०, मालवण – ५१, सावंतवाडी – ६५, वैभववाडी – ३८, वेंगुर्ले – २५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २.

जिल्ह्यात ५५ बेड शिल्लक

जिल्ह्यात कणकवलीतील बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह (६), दोडामार्ग आयटीआय येथील कोविड केअर सेंटर (१४) आणि जिल्हा पोलीस मुख्यालय (३५) रुग्णांना दाखल करण्यासाठी बेड शिल्लक आहेत. इतरत्र बेड शिल्लक नाहीत.

जिल्ह्यात एक लाख १९ हजार १०६ जणांचे लसीकरण

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील लसीकरण केंद्राकरिता आजपर्यंत कोविशील्ड लशीचे ९८ हजार ५८० डोस आणि कोव्हॅक्सीन लशीचे ३५ हजार ८१० डोस असे एकूण एक लाख ३४ हजार ३९० डोस मिळाले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एक लाख १९ हजार १०६ नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी ९७ हजार ४९७ नागरिकांनी पहिला, तर २१ हजार ६०९ नागरिकांनी दोन्ही डोस घेतला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply