खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..
झोंपाळ्यावरची गीता – अध्याय अठरावा : मोक्षसंन्यासयोग
युद्धाला सन्मुख । आणि धाक लोकीं ।।
कर्म सिद्ध हें कीं । क्षत्रियांचें ।।२५।।
पालन पशूंचे । व्यापारहि साचे ।।
कर्म हें वैश्यांचें । जन्मसिद्ध ।।२६।।
सेवा याति धर्म । नेमिला शूद्रांना ।।
पाळावा अर्जुना । ज्याचा त्यानें ।।२७।।
आपुलाल्या कर्मीं । मग्न सदा जे कां ।।
लाभे त्याच लोकां । ज्ञान पार्था ।।२८।।
Chapter 18 – Accomplishment Of Sacrifice
Preparedness for battle । Commanding over the people ।
These are but natural । Duties of the Kshatriyas ।।25।।
Cattle pasturing । Producing and trading ।
Is duty rendering । For the Vaisyas ।।26।।
And proletariat class । Known as the Shudras।
Is adviced to pass । Servitude ।।27।।
Those who engage । To duties inherited ।
Only for them । Knowledge is granted ।।28।।
(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)
……..
श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
अथाष्टादशोऽध्यायः । मोक्षसंन्यासयोगः
श्रीभगवानुवाच ।
कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम् ।
परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् ॥ १८-४४॥
स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः ।
स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु ॥ १८-४५॥
यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम् ।
स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः ॥ १८-४६॥
(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)
(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)
(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

झोपाळ्यावरची गीता
झोंपाळ्यावरची गीता
रचना : अनंततनय (दत्तात्रेय अनंत आपटे)
संकलन : अनिकेत कोनकर
प्रकाशन : सत्त्वश्री प्रकाशन

