सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२१ मे) नवे ३१७ करोनाबाधित रुग्ण आढळले. आज दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ३९५, तर आतापर्यंत एकूण १६ हजार ४१२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले.
पुन्हा तपासणी केलेल्या २४ रुग्णांसह आज सापडलेल्या रुग्णांची संख्या ३१७ आहे. आजच्या नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता २१ हजार २७३ झाली आहे. आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ३९, दोडामार्ग – २४, कणकवली – ३४, कुडाळ – ५६, मालवण – ५४, सावंतवाडी – ३४, वैभववाडी – ४, वेंगुर्ले – ४८.
सध्या जिल्ह्यात ४ हजार ३०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वाधिक ८३८ सक्रिय रुग्ण कुडाळ तालुक्यात, तर त्याखालोखाल ७६२ रुग्ण सावंतवाडी तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ४७४, दोडामार्ग ३१४, कणकवली ५८९, मालवण ६३९, वैभववाडी १०१, वेंगुर्ले ५७०, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २०. सक्रिय रुग्णांपैकी ३३४ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी २८७ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
आज जिल्ह्यात १० जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ५४८ झाली आहे. आजच्या मृतांचा तपशील असा – देवगड १, दोडामार्ग १, कणकवली १, कुडाळ ४, सावंतवाडी १, वेंगुर्ले २.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या तालुकानिहाय मृत्यूची एकूण संख्या अशी – देवगड ६४, दोडामार्ग – १६, कणकवली – १२०, कुडाळ – ८६, मालवण – ८०, सावंतवाडी – ९७, वैभववाडी – ४०, वेंगुर्ले – ४३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २.
Follow Kokan Media on Social Media

