रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२१ मे) करोनाचे नवे ४५० रुग्ण आढळले, तर २५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज सलग बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या घटली आहे. मृतांचे प्रमाणही आज आणखी वाढले आहे.
जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी १६३, गुहागर ७, चिपळूण ३१, संगमेश्वर २४, लांजा ४० आणि राजापूर १८ (एकूण २८३). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार आज एकहीरुग्ण आढळला नाही. कालच्या तारखेचे रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रुग्ण १६७. (सर्व मिळून ४५०). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३२ हजार ७२ झाली आहे.
आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून चार हजार २५९ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज आणखी दोन हजार ८० जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ५३ हजार ५८१ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
जिल्ह्यात आज २५२ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या २६ हजार ७८५ झाली आहे. बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या घटल्याने करोनामुक्तांची टक्केवारी कमी झाली असून ती ८३.५१ टक्के आहे.
जिल्ह्यात आज पूर्वीचे २१ आणि आजचे १५ अशा ३६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजारावर गेली असून ती एक हजार २८ झाली आहे. मृत्युदर ३.२० टक्क्यांवर पोहोचला आहे.
तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी २९१, खेड ११३, गुहागर ४५, दापोली ९५, चिपळूण २०६, संगमेश्वर १३८, लांजा ५६, राजापूर ७३, मंडणगड ११. (एकूण १०२८).
Follow Kokan Media on Social Media

